बार्शी – येथील राजर्षी शाहू लॉ कॉलेजमध्ये कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रत्नदीप सोनकांबळे यांच्या उपस्थितीमध्ये झाले , महाविद्यालयातील विविध विभागामधील बहुसंख्य मुले व मुली यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. तसेच महाविद्यालयातील आय.क्यू.एस.सी. समन्वयक प्रा. शिखारे मॅडम, प्रा. तायडे, कृष्णा सातपुते, कोल्हे यांनी सुद्धा रक्तदान केले.
रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ.दत्तप्रसाद प्रेमलता मनोहर सोनटक्के, प्रा.खोत, प्रा. वडने, प्रा. काळे, प्रा. शेख, प्रा.पाटील, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. मिठा मॅडम, प्रा. कुलकर्णी मॅडम, प्रा. सुरवसे मॅडम, प्रा.साखरे मॅडम, प्रा. हरदडे मॅडम, गव्हाणे, वाघे, शेळके, माने व ठोंबरे यांनी परिश्रम घेतले.























