सोलापूर : पुणे येथील आल्हाट आर्ट स्टुडिओ येथे बनविण्यात येत असलेल्या त्यागमुर्ती माता रमाई यांच्या पुतळा क्ले माॅडेलची शिष्टमंडळाने पाहणी केली.
थोड्याफार दुरूस्त्या सुचवून आल्हाट आर्ट स्टुडिओचे संचालक सुभाष आल्हाट यांना सूचना करण्यात आल्या.
त्यागमुर्ती माता रमाई यांच्या पुतळ्याचा क्ले माॅडेल पाहून त्यात थोड्याफार दुरूस्त्या सुचवून आल्हाट आर्ट स्टुडिओ चे संचालक सुभाष आल्हाट यांना पुतळा बनविण्यास सर्वानुमते संमती देण्यात आली. यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲड संजीव सदाफुले, शहर अध्यक्ष देवा उघडे, जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत काळे , शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, शहर प्रभारी सुहास सुरवसे, प्रविण कांबळे,
भारतीय बौद्ध महासभेचे आण्णासाहेब वाघमारे, नागसेन माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव, रिपाइं(आठवले) शहर उपाध्यक्ष
माजी नगरसेवक अरुण भालेराव , नगरसेवक गौतम कसबे, अजित गायकवाड , महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रशांत गुंड आदी उपस्थित होते.




















