पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे कनिष्ठ महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची क्रिकेट संघात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात झाली आहे.
नाशिक येथे झालेल्या 14 वर्षाखालील विद्यालयाच्या क्रिकेट खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या वतीने प्रतिनीधीत्व करीत पिलीव च्या पाच सुपुत्रांनी सोलापूर जिल्हयाचे नाव उज्वल करून ऑल इंडिया आयकाॅन खेळाडू तसेच सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेट असोशियन प्रमुख प्रशिक्षक एल बी गोरे (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली त्रतीय क्रमांकाचे पारितोषिक जिंकले.
कॅप्टन – दर्शन सचिन भालेराव उपकॅप्टन – आदिलअब्दुल रहिम यळसंगिकर, आदित्य अमोल कदम, आदर्श संतोष बगाडे , जय तानाजी लोखंडे, एल बी गोरे(सर) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एल बी स्पोर्ट्स शॉप,पिलीव क्रिकेट क्लब: एकूण 35 खेळाडूंचा दररोज पिलीवच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलिपे कनिष्ठ महाविद्यालयांच्या मैदानावरची हे खेळाडू सराव करीत असतात, त्यातूनच जिल्हास्तरीय ट्रायल मध्ये या 5 खेळाडूंची निवड झाली आहे , आणि या खेळाडूंनी सोलापूर जिल्हयाचे प्रतिनीधीत्व करताना राज्यस्तरीय तीन दिवशीय क्रिकेट स्पर्धेत पिलीव च्या वरील पाच सुपुत्रांनी सोलापूर जिल्हयाचे नाव व पिलीव गावचे नाव उज्ज्वल करीत असताना 34 जिल्हयांचे संघ असताना देखील सोलापूर जिल्हयाला त्तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले आहे. या उत्तुंग यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अशोक बागल ,पर्यवेक्षक रमेश किरगत, क्रिडा शिक्षक भंडारे सर, सत्यवान वाघमारे, राजेंद्र झाडे, वरिष्ठ लेखनिक तुकाराम भोरकडे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय पाटील, तसेच पिलीव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
फोटो. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेले कॅप्टन दर्शन भालेराव उप कॅप्टन आदिलअब्दुल यळसंगीकर ,आदित्य कदम, आदर्श बगाडे ,जय लोखंडे, प्रशिक्षक एल बी गोरे आदी मान्यवर.



















