पंढरपूर – पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा पी.पी.सावनी विद्यापीठ, सुरत (गुजरात) येथे दि. २३ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा क्रिकेटचा महिला संघ सहभागी होणार आहे. त्या संघामध्ये उमा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली साक्षी सागर हिची क्रिकेट संघात निवड झाली आहे. साक्षीला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण यांचे मार्गदर्शन लाभले. साक्षीच्या या निवडीबद्दल संथेचे अध्यक्ष प्रशांतराव परिचारक, उपाध्यक्ष मुकुंदराव परिचारक, सचिव राजगोपालजी भट्टड, खजिनदार रमेश लाड, संथेचे विश्वस्त अँड. प्रणव परिचारक व इतर संस्था पदाधिकारी, संथेचे कार्यवाह डॉ. मिलिंद परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धिरजकुमार बाड यांनी साक्षीचा सत्कार करून अभिनंदन केले व तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
—-




















