सोलापूर – प्रतीक गोस्वामी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सोलापूर विभागातील वाडी– सोलापूर सेक्शनमध्ये सविस्तर संरक्षा निरीक्षण करून परिचालन कार्यक्षमता, संरक्षा मानके आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
वाडी येथे क्रू लॉबी, नवीन क्रू काउन्सेलिंग रूम, रनिंग रूम व नवीन सुविधा, नूतनीकरण केलेले महिला प्रतीक्षालय तसेच नवीन पॉली क्लिनिक व संगणकीकृत रेडिओग्राफी प्रणालीच्या पाहणीने झाली. गोस्वामी यांनी ए-क्लास अपघात निवारण रेल्वेगाडी, १४० टन क्रेन, रूट रिले इंटरलॉकिंग आणि नवीन वाडी ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन डेपोचे निरीक्षण केले. वाडी येथे गती शक्ती युनिट्स आणि वाडी यार्ड रीमॉडेलिंग योजनेवरील प्रगतीबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला.
कलबुरगि येथे नवीन ट्रॅक मशीन रेस्ट हाऊस आणि सिग्नल डेपोमधील नवीन QC लॅबचे निरीक्षण करण्यात आले. सिग्नल व दूरसंचार विभाग तसेच इतर विभागांच्या प्रदर्शनांचा आढावा घेण्यात आला. अल्ट्रा सोनिक फ्लॉ डिटेक्शन प्रणालीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
महाव्यवस्थापकांनी किमी ५६४/७-८ येथील इंजिनिअरिंग इंटरलॉक्ड गेटचे निरीक्षण केले आणि लेव्हल क्रॉसिंग गेट तसेच ओव्हरहेड इक्विपमेंट मापदंडांचा आढावा घेतला. त्यानंतर पॉइंट्स आणि स्विच एक्स्पान्शन जॉइंट्स, ट्रॅक्शन सब स्टेशन आणि गौड़गांव यार्डमधील टेस्टींग व्हॅन तपासण्यात आली. दुधनी – बोरोटी सेक्शनमधील बोरी पूल तसेच बोरोटी – नागणसूर सेक्शनमधील अप लाईनवरील कर्व क्रमांक १०३चे निरीक्षण करून OHE मोजमापांचा आढावा घेण्यात आला.
अक्कलकोट रोड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, नूतनीकरण केलेले ट्रॅक मशीन रेस्ट हाऊस, रेल्वे कॉलनी व बागेची पाहणी करण्यात आली आणि वृक्षारोपण करण्यात आला. टिकेकरवाडी येथे गँग क्रमांक ०१ चे निरीक्षण करण्यात आले तसेच कोचिंग डेपो योजनांबाबत माहिती देण्यात आली.
सोलापूर येथे नव्याने नूतनीकरण केलेल्या क्रीडा संकुल व स्केटिंग रिंकची पाहणी करण्यात आली. तसेच सोलापूर रेल्वे रुग्णालयातील उन्नत नेत्ररोग विभागातील ऑटो केरॅटो रिफ्रॅक्टो टोनोमीटर, डिजिटल लेन्सोमीटर, डिजिटल फोटो LED स्लिट लॅम्प विथ अप्लॅनेशन टोनोमीटर तसेच इलेक्ट्रो-हायड्रॉलिक ॲक्ट्युएटर असलेले नवीन ऑपरेटिंग टेबल यांची पाहणी केली.
सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा तसेच मुख्यालय व सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकारी निरीक्षणादरम्यान महाव्यवस्थापकांसोबत उपस्थित होते.






















