जेऊर – वांगी नं एक तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सुरेखा दिवटे तर उपसरपंचपदी नरसिंग देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अकरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य.श्री निळकंठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला यश मिळाले होते. माजी सरपंच शुभांगी देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या दोन्ही पदासाठी निवड कार्यक्रम जाहीर केला होता.
यामध्ये सरपंचपदासाठी सुरेखा दिवटे व उपसरपंचपदासाठी नरसिंग देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी विशाल गायकवाड यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री विद्यानंद पाटील माजी सरपंच सौ शुभांगी संतोष देशमुख.व .माजी उपसरपंच बासाहेब दैन दिगंबर पाटील .तुकाराम देशमुख . कालिदास भोसले. हरिभाऊ तकीक , प्रताप देशमुख.. हैबतराव देशमुख संजय कदम. मगन दिवटे. गोरख देशमुख तानाजी देशमुख. हनुमंत पाटील धनंजय गायकवाड. राहुल जगताप .व लोकविकास सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन . सचिन देशमुख.दत्ता देशमुख. दशरथ देशमुख. प्रकाश महाडिक पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते























