सोलापूर : एपस्टाईन प्रकरणातील कथित फाईल्स, भारत–अमेरिका व्यापार करार, राहुल गांधी यांना दिलेली धमकी, प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेला हल्ला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या अवमानाच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी “राहुलजी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है”, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनाला संबोधित करताना चेतन नरोटे यांनी भारत–अमेरिका व्यापार करार देशहिताचा नसून शेतकरी, व्यापारी, कामगार व ग्रामीण अर्थव्यवस्थेला तोटा करणारा असल्याचा आरोप केला. एपस्टाईन प्रकरणानंतर अमेरिकेच्या दबावाखाली करार करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी करार रद्द करण्याची मागणी केली.
तसेच राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. पुणे येथे हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
हरियाणातील सिक्री येथे भाजप आमदार मूलचंद शर्मा यांच्या मालकीच्या मिलान बँक्वेट हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणधीरे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, कार्याध्यक्ष हनुमंत सायबोळु, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, हारुण शेख, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, हाजी मैनुद्दीन शेख, राजन कामत, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, गिरीधर थोरात, लखन गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, संजय गायकवाड, सागर उबाळे, भीमराव शिंदे, एजाज बागवान, धीरज खंदारे, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, संघमित्रा चौधरी, अनिता भालेराव, मीना गायकवाड, प्रकाश गेंट्याल, शिवाजी साळुंखे, अभिषेक गायकवाड, समीर पांडगळे, मोहसीन फुलारी, महेश सर्वगोड, लक्ष्मण बनसोडे, सचिन पवार, साई शिंदे, चंद्रकांत टिक्के, जब्बार शेख, धैर्यशील बाबरे, सूर्यकांत वानखेडे, अभिलाष अच्युगटला, बन्नप्पा कंपली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

























