बार्शी – मुक्या प्राण्यांची झुंज लावणे गैरकायदेशीर असून अशा प्रकारच्या कृत्यामुळे संबंधित प्राण्यांना गंभीर शारिरीक इजा, वेदना व तसेच मृत्यु होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा रेडयांच्या टकरींचे आयोजन करुन त्यातील एका रेडयाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात सातजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप वसंत माने, विशाल मोहन खटके, चंद्रकांत सिद्धेश्वर डमरे, गजानन तानाजी गरड, अमर शकील शेख, तुकाराम कुंडलिक गायकवाड (सर्व रा. आगळगाव ता. बार्शी), पवन लिंगाडे (रा. सौंदरे ता. बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार अरुण डुकळे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना रविवार रोजी दुपारी साडेचार वाजता धनगरवाडी (आ) ता. बार्शी शिवार येथे घडली.
शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर धनगरवाडी (आ) ता. बार्शी येथे मुक्या प्राण्यांची झुंज लावणे गैरकायदेशीर असताना संबंधित प्राण्यांना गंभीर शारिरीक इजा, वेदना व तसेच मृत्यु होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा त्यांनी रेडयांच्या टकरींचे आयोजन करुन त्यातील एका रेडयाच्या मृत्यूस कारणाभूतीं झाले आहेत यांचेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५, प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) (a), 11(1)(m) (ii), 11 (1) (n) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पोलस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.
Views: 14