करकंब – केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत इ.८वीतील विद्यार्थासाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये (एनएमएमएस) रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता.पंढरपूर येथील ३८ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना एनएमएमएस परीक्षा प्रमुख संजय पाटील,विज्ञान शिक्षिका मनीषा ढोबळे,शिक्षक गणेश गायकवाड,समाजशास्त्र शिक्षक नामदेव सलगर,गेस्ट लेक्चरर महादेव व्यवहारे बुद्धिमत्ता यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थांचे दयानंद शिक्षण संस्था सोलापूरचे स्थानिय सचिव महेश चौप्रा,प्रशासकीय अधिकारी डॉ.विजयकुमार उबाळे,प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,शालेय शैक्षणिक सल्लागार समिती सदस्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
एनएमएमएस परीक्षेत सुयश प्राप्त करणारे विद्यार्थी,विद्यार्थिनी.
पूर्वा देशमुख १३४ गुण,प्राप्ती परदेशी १३१,मोनाली माने १२८,पूजा पिसे ११६,ओंकार धायगुडे ११५,अनुष्का भाळवणकर ११२,अथर्व ढोबळे ११२,सानिका शेटे १०५,दिव्या भोंग १०४,हर्षद नरसाळे १०३,योगेश शेटे ९९,प्रिया शिंदे ९९,भाग्यश्री टेके ९६,रोशनी साळवे ९५, सोहम रणदिवे ९३,वैभव वसेकर ९२,तन्मय वसेकर ९०,शुभम सनगर ८९,श्रुती भोरे ८८,ज्ञानेश्वरी धोत्रे ८७, अनुजा काळे ८८,संजीवनी मदने ८५,साईराम कचरे ८२,राधिका गारुडे,८१,अरहम भाळवणकर ८१,श्रावणी देशमुख ८१,पवन गायकवाड ८१,समर्थ शिंदे ७९,सोहम घाडगे ७७,समीक्षा धोत्रे ७५,समर्थ गुंड ७४,राधिका व्यवहारे ७३,अविनाश शिंदे ६७,समृद्धी गायकवाड ६६,आदित्य गायकवाड ६६,सार्थक खंडाळे ६४,सुजित क्षीरसागर ६३,अभिषेक खंदारे ६६.

























