कुर्डुवाडी – पिंपरी पुणे येथील आचार्य अत्रे कला मंदिर संत तुकाराम नगर येथे कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार२०२६ सोहळा कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
शिवजयंती निमित्त आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अंकुश आतकर यांना पिंपरी पुणे येथील आचार्य अत्रे कला मंदिर संत तुकाराम नगर येथे कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कलावंत दादासाहेब फाळके असोसिएशन पुणे, स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिमागदारपुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली त्यानंतर विविध क्षेत्रातील १७० कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यामध्ये अभिनेता अंकुश आतकर यांच्या
चित्रपट व अभिनय कार्याची विशेष दखल घेण्यात आली या भव्य सोहळ्याचे नेतृत्व गिरीश सुदास राजूरकर यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे सचिव मंगेश गजबे खजिनदार सिद्धार्थ शिंदे तसेच स्वराज्य फिल्म प्रोडक्शन ची संपूर्ण टीमने परिश्रमपूर्वक सर्व नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला आयोजनातील शिस्तबद्धता आकर्षक नियोजन ही कलाकारांना दिलेला सन्मान यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
यावेळी असिस्टंट पोलीस कमिशनर सुनील हिरूरकर, फोर्स वायुसेना तांत्रिक अधिकारी सुरेश पोखरकर, स्टार माझाचे संचालक राहुल शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री काजल शिंदे, अभिनेत्री मधू कुलकर्णी, अभिनेते काळुराम ढोबळे, निर्माता आणि दिग्दर्शक बाळासाहेब बांगर, उमेश बांदल,भाग्यदेव घुले, अभिनेते प्रशांत तपस्वी, (तुला फिरवीन माझ्या गाडीवर फेम )देव झुंबरे आणि जगदीश सांधानशिव आदी चित्रपट कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
टाळ्यांच्या कडकडाटात झालेला हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी स्मरणीय ठरला. शेवटी गिरीश राजूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

























