सोलापूर – सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक सोलापूर मध्ये “आग सुरक्षा व्यवस्थापनाच्या मॉक ड्रिल ” चे आयोजन करण्यात आले होते.आग लागल्यावर वेगाने कार्यवाही करणे आणि योग्य सुरक्षा उपाय योजनेचे महत्त्व लक्षात घेत, “आग सुरक्षा व्यवस्थापन कार्यशाळा” आयोजित केली गेली. या कार्यशाळेचा उद्देश जागरूकता वाढवणे आणि विविध शाळा, महाविद्यालये, आणि व्यावसायिक संस्थांमध्ये अग्निसुरक्षा प्रक्रियेचे प्रभावी प्रशिक्षण देणे होता.
कार्यशाळेत अग्निशामक यंत्रणा, अग्निसंवेदनशील क्षेत्र, आपत्कालीन सूचना प्रणाली आणि अग्निशमनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल माहिती देण्यात आली. सहभागींच्या सुरक्षिततेसाठी, पॅटर्न आणि प्रत्यक्ष परिस्थितीत कार्यप्रदर्शन करण्यासाठी विविध प्रात्यक्षिके देखील आयोजित केली गेली. प्रात्यक्षिक मध्ये मॉक ड्रिल चा उद्देश आग लागल्यावर तत्परतेने आणि प्रभावीपणे प्रतिक्रिया देण्याची तयारी तपासणे होते.
सोलापूर अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी, श्री. राकेश साळुंखे , श्रीकांत भडके व अग्निशामक दलाचे इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी या कार्यशाळेच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, “आग सुरक्षा व्यवस्थापन हे प्रत्येक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांमध्ये याबाबत जागरूकता वाढवून, आगीच्या घटनांमध्ये कमीत कमी हानी होण्यासाठी आग सुरक्षा व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.,”
यावेळी सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे यांनी “या मॉक ड्रिलमुळे विद्यार्थिनींना आग लागल्यास घाबरून न जाता योग्य पद्धतीने कसे वागावे याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. अग्निशामक यंत्र हाताळण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. तसेच आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांना मदत करणे, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आणि अग्निशमन दलाला योग्य माहिती देणे” याचे महत्व याप्रसंगी सांगितले
या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण होते – अग्निसंवेदनशील उपाययोजना, स्मार्ट फायर सिस्टीम तसेच आपत्कालीन प्रोटोकॉल्सचे प्रशिक्षण. सहभागी विद्यार्थ्यांना विविध अग्निशमन उपकरणांचा वापर कसा करावा याचे सखोल प्रशिक्षण देखील देण्यात आले. अशा कार्यशाळांमुळे उद्योग, शाळा आणि सरकारी कार्यालये यांच्यात आग सुरक्षा संबंधित योग्य मार्गदर्शन मिळाल्याने, भविष्यकालीन आगीच्या घटनांमध्ये कमी तोट्याची शक्यता निर्माण होईल.
या मॉक ड्रिलला कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे सर, एनएसएस युनिट से प्रमुख प्रा. प्रतिभा पाटील , सर्व विभाग प्रमुख उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्युत विभागातील प्रा. प्रवीण गौडा, प्रा. गायत्री लंगोटे ,प्रा. संग्राम माने, प्रा. कोमल कांबळे, प्रा. वृषाली अंदेली , मधुमती किनीकर, धोंडप्पा कोळी, आदींनी परिश्रम घेतले. प्रत्येकाने आग सुरक्षा प्रक्रियेचे पालन केले पाहिजे, असे सांगत कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

























