अक्कलकोट – त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त्य दत्तअवतार श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर श्री तीर्थकत्र अक्कलकोट येथे सुमारे १ लाखापेक्षा अधिक भाविकांनी स्वामीचे दर्शन घेतले . महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटक गुजरात सह भारतातील विविधि भागातील भविक स्वामी भक्तानी अक्कलकोट नगरी गजबजली. हाताने टाळी मुखाने नाम प्रमान बोला जय जय स्वामी समर्थ नाम च्या गजरात पायी दिंडी पालखी सोहळे त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त्य अक्कलकोट तीर्थकत्री दाखल झाले होते . अनेक किलो मीटर दुर अंतरा वरून पायी दिंडी सोहळ्याद्वारे आलेले स्वामी भक्त यांच्यात कुठला ही थकवा नव्हता सारे स्वामी भक्त स्वामी नाम स्मरणात तल्लीन झाले होते .
वटवृक्ष स्वामी मंदिर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ‘ स्वामीचे समाधी मठ ‘ राजेराय मठ ‘ गुरु मंदीर ‘ आदि सह बॅगेळी स्वामी चे विश्रांती धाम येथे भाविकांनी दर्शन घेतले वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शन व्यवस्था कामी अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्ग दर्शना खाली चोख व्यवस्था ठेवली होती .
लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद
श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे लाखो भाविकांसाठी महाप्रसाद भोजनाची चोख व्यवस्था संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्ग दर्शना खाली मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली चोख ठेवण्यात आली होती .
पोलीसाचा चोख बंदोबस्त
विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पवार यांनी मंदिर परिसरात भाविकांना सुलभ वावर होण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते .पोलीसांनी पहाटे पासून च मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी वाहतुकीची विशेष खबरदारी घेतली .
प्रसादिक वस्तुची खरेदी
हार नारळ पेढे चुरमुरे फोटो कंठी माळ अगरबत्ती धुप चरित्र पुस्तके पोथी ग्रंथ फळे आदि प्रासादिक वस्तु सोलापुरी शेंगा चटणी कडक भाकरी आदिची खरेदी भाविकांनी केल्याचे विक्रेत्या नी सांगितले .
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वामींच्या दर्शनाकरिता पायी पालखी दिंडी सोहळे
या पौर्णिमेनिमीत्त पुणे, मुंबई, दौंड, मालेगांव, मसले चौधरी, बार्शी, धाराशीव, सोलापूर, कर्जत, भोर, खर्डी-पंढरपूर, इत्यादी ठिकाणांहून दिंडी व पालखी सोहळे
सोबत पायी चालत स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात आले होते
Views: 4