वळसंग – तालुका दक्षिण सोलापूर ग्रामपंचायत अधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्य वळसंग गावातील सांडपाणी, गटर पाणी व्यवस्थापन करण्यामध्ये दुर्लक्ष करून जनतेच्या आरोग्यासोबत खेळी खेळत आहे. वार्ड क्रमांक तीन मध्ये अधिक दुर्लक्ष होत असल्याची दिसून येत आहे. आचेगाव रोड शेखलाल घरापासून येत असलेल्या सांडपाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका बाजूला श्री शंकरलिंग हायस्कूल, दुसऱ्या बाजूला श्री चन्नय्या स्वामी मठ तसेच पाणी वाहत श्री बसवेश्वर मंदिर समोरून वाहतो. श्री बसवेश्वर गल्लीतील राहणाऱ्या लोकांची पिण्याची पाणी व्यवस्था त्या सांडपाणी मध्ये असणाऱ्या हातपंपा पासून होतो.
ग्रामपंचायत कडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर त्यावर मुरूम टाकून तात्पुरता काम केला जातो. विद्यार्थी आरोग्याची खेळ, धार्मिक स्थळांचे अनादर, हातपंप वापरून पाणी पिणाऱ्या लोकांची बेदखल हे ग्रामपंचायत करत असलेले दुर्लक्ष आहे. प्रधानमंत्री सडक योजनेतून रस्ते मंजूर असले तरी आराखडा तयार करून ठेकेदार पळून गेल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत सरपंच जगदीश अंटद व वार्ड क्र.०३ चे सदस्य यांनी याकडे जातीने लक्ष घालून विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची व मंदिरांचे काळजी घ्यावी असे या परिसरातील लोकांची मागणी आहे.
शेखलाल घरापासून बंद गटारीची नियोजन करून रस्त्याचा निर्माण करावी. तसेच हातपंप जागी स्वच्छता राखून जनतेचा आरोग्य संभाळावे. येत्या मे मध्ये ग्रामदैवत श्री चौडेश्वरी यात्रेचा केंद्रबिंदू बाळबट्टल येणाऱ्या मार्ग सुद्धा तोच आहे त्यासाठी लवकरात लवकर यावर तोडगा काढावी असे विनंती श्री बसवेश्वर गल्लीतील अनेक नागरिकांची मागणी आहे.

























