जेऊर – ३ ते ८ डिसेंबर २०२६ दरम्यान व्हिएतनाम लाओस येथे जागतिक पातळीवर होणाऱ्या १७ व्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप -२०२६ या स्पर्धेत वीट (ता. करमाळा) गावचे सरपंच महेश प्रभाकर गणगे हे आंतरराष्ट्रीय पंच म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत .
वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष दातुक पॉल चुवआ आणि सरचिटणीस चेतन पठारे व इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स (आय बी बी एफ)चे अध्यक्ष स्वामी रमेश यांनी महेश गणगे यांना पंच म्हणून निवडीचे पत्र दिले आहे .महेश गणगे यांनी यापूर्वी झालेल्या वर्ल्ड,एशिया,साऊथ एशिया,अशा विविध स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय पंच म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगातील १४३ देश सहभागी होणार आहेत .सदर स्पर्धा मेन्स शरीर सौष्ठव,वुमनस शरीर सौष्ठव,मेन्स – वुमन स्पोर्ट्स फिजिक्स, फिटनेस फिजिक्स ,मास्टर बॉडी बिल्डिंग अशा विविध प्रकारात व एकूण ५० गटात होणार असून ९५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
प्रतिक्रिया-
गतवर्षी इंडोनेशिया येथे झालेल्या १६ व्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये भारताने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब मिळवत सर्वात जास्त मेडल मिळवून सांघिक विजेतेपद हा किताब पटकावला होता . चालू वर्षीच्या या स्पर्धेत भारताचा संघ विजयाचा प्रमुख दावेदार ठरणार असून सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी झालेली आहे.
(महेश गणगे,सरपंच वीट. ता.करमाळा)
Views: 12