मोडनिंब – भेंड (ता. माढा) येथे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सदिच्छा भेट देऊन ‘पहाट’ उपक्रमांतर्गत गावाचा सर्वांगीण विकास, समाजकल्याण, गुन्हेगारीमुक्त गाव, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, वृक्ष लागवड आणि शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार असल्याचे सांगितले.
माढा तालुक्यातील भेंड मॉडेल गाव म्हणून विकसित करण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे भेंड गाव दत्तक घेण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार, असे डॉ. संतोष दळवी यांनी सांगितले. गावामध्ये पहाट उपक्रम संकल्पना राबवून भेंडमध्येही शाश्वत विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन प्रशासन पूर्णपणे ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास त्यांनी भेंड ग्रामस्थांना दिला.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अंजली कृष्णा, कुडूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल मोहिते, सरपंच डॉ. मनीषा दळवी, उपसरपंच विमल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राजमती जाधव, उषा मते, धनाजी जानराव, प्रभाकर दळवी, ग्रामसेवक रूपाली सुर्वे आदी उपस्थित होते.




















