Sunday, March 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन विधी सेवा देणे काळाची गरज

तरुण भारतbyतरुण भारत
March 1, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर व्हावी,यासाठी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली असून ती यशस्वी करण्यासाठी लोकांना त्यांचे अधिकार, हक्क माहित असणे गरजेचे आहे. शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, त्याकरिता कायद्याचे ज्ञान देण्याबरोबरच सर्व् शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून शासकीय कल्याणकारी योजनांचा महामेळावा म्हणजेच महाशिबीर या उपक्रमांचे आयोजन केले असून विधी सेवा देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयातील सोलापूर जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार यांनी केले.

   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी वडाळा येथील माऊली महाविद्यालयात महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबीराचे उद्घाटन न्यायमूर्ती जमादार व न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती जमादार बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा सत्र् न्यायालयातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, पोलीस आयुक्त एम.राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव यावेळी विचारपीठावर उपस्थित होते. 

     न्यायमूर्ती जमादार पुढे म्हणाले, न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी घटनेला अभिप्रेत असलेले विधी सेवा प्राधिकरण 1987 साली सुरु झाले तेव्हा फक्त गरीबांना त्यांचे न्यायालयातील तंटे चालविण्यासाठी वकील उपलब्ध करुन देणे एवढेच काम होते. मात्र, यामुळे सामाजिक व आर्थिक विषमता दूर होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हक्क व अधिकाराबद्दल ज्ञान देण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला.त्यानंतर सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी लोककल्याणकारी राज्य, ही प्रजासत्ताक राज्याची संकल्पना यशस्वी करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत लोककल्याणासाठी असलेल्या योजना प्रभावीपणे पोहोचल्या  पाहिजे, या उद्देशाने विधी सेवा प्राधिकरणाचा महाशिबीर हा तिसरा टप्पा सुरु झाला असून केवळ योजनेसाठी आर्थिक तरतूद करुन उद्देश साध्य होणार नाही. तर  प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत त्या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, हा विधी सेवा प्राधिकरणाचा उद्देश आहे. 

  न्यायमूर्ती पुनीवाला म्हणाले, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत म्हणजेच गरीबातल्या गरिबांना सहज न्याय मिळावा, हे महात्मा गांधींना अभिप्रेत होते.महात्मा गांधींचे न्याय व्यवस्थेबद्दलचे विचार सत्य व सामाजिक समतेवर आधारित होते. याच विचाराने विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज सुरु असून जर आपल्याकडे चांगली न्याय वितरण प्रणाली असेल तर लोकशाही मजबूत होईल जी आपल्या देशाची प्रगती करण्यास मदत करेल. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सोबत घेऊन सर्वसामान्य घटकापर्यंत न्याय, त्यांचे हक्क व अधिकार याची जाणीव करुन दिली जात आहे.लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. आम्हाला अशा कायदेशीर सेवेबद्दल खूप आनंद आहे. समाजातील प्रत्येक घटक या उपक्रमाला साथ देतील,अशी आम्हाला आशा वाटते.“ 

    केवळ न्यायापुरते मर्यादीत न राहता शासकीय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होऊन प्रजासत्ताक ही लोककल्याणकारी राज्याची संकल्पना सार्थ ठरावी, हा विधी सेवा प्राधिकरणाचा या उपक्रमाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी प्रास्तविकातून सांगितले. सोलापुरातील एन.ए.बी. अंधकार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले, शहर व जिल्हा पोलीस यंत्रणेतील बँन्ड पथकाने न्यायमूर्ती व मान्यवरांचे स्वागत केले.सोलापूर येथील करुणाशील समितीचे अशुतोष नाटकर आणि कलाकारांनी बालविवाह विरोधी जनजागरण व घर दोघांचे हे दोन पथनाट्य सादर केले.न्यायाधीश अश्विनी बिराजदार व न्यायाधीश वैष्णवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर यांनी आभार मानले.

चौकट 

दृष्टिक्षेपात महाशिबीर

महाशिबीरात विविध शासकीय यंत्रणांचे 40 स्टॅाल होते.

सर्व शासकीय विभागांचा सहभाग

सुमारे सहा हजार लोकांची उपस्थिती

मूळचे अक्कलकोटचे सुपूत्र असलेले न्यायमूर्ती जमादार यांनी न्यायमूर्ती पुनीवाला यांची परवानगी घेऊन मराठीमध्ये भाषण करीत असल्याचा खुलासा केल्यानंतर उपस्थितांमधून टाळ्यांची उत्फूर्द दाद

कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथराव मुंढे शेतकरी अपघात योजना, समाज कल्याण विभाग, ओ.बी.सी.महामंडळा्च्या लाभार्थींना प्रातिनीधीक स्वरुपात न्यायमूर्तींच्या हस्ते योजनेच्या लाभाचे वितरण 

दोन ठिकाणी चोरीमध्ये गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना न्यायमूर्ती पुनीवाला व न्यायमूर्ती जमादार यांच्या हस्ते सुफूर्द करण्यात आला.

दोन्ही न्यायमूर्तींनी सर्व 40 स्टॅालला भेटी देऊन त्या त्या विभागाच्या कामकाजाची माहिती व सामान्य जनतेशी हितगूज केले. काही स्टॅालवर त्या विभागाच्या लाभार्थिंना लाभाचे वितरणही केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर  व त्यांच्या सहका-यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट व शिस्तबद्ध नियोजन केले होते.

फोटो ओळी – फोटो 1 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात वृद्ध महिलेची अपुलकीने विचारपूस करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला त्यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव

फोटो 2  जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात भूमी अभिलेख खात्याच्या कामकाजाची माहिती घेताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला,त्यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव

 फोटो 3 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात सहभागी झालेल्या विविध शासकीय विभागांच्या 40 स्टॅालचे उद्घाटन करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव

फोटो 4 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्याला मदत वाटप करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला

Post Views: 39
Previous Post

संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परिक्षेत यश

तरुण भारत

तरुण भारत

ताज्या बातम्या

लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन विधी सेवा देणे काळाची गरज

March 1, 2026

संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परिक्षेत यश

March 1, 2026

तातडीने बससेवा सुरू करण्यासाठी थेट परिवहन मंत्र्यांकडे मागणी

March 1, 2026

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज

March 1, 2026

ओंकार कारखान्याचा गाळप हंगाम सांगता समारंभ

March 1, 2026

मावा विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार

March 1, 2026

शहर पोलिसांची अनधिकृत भोंग्यांवर कारवाई

March 1, 2026

भव्य आणि आधुनिक ‘हाय-टेक’ बसस्थानकाचा मार्ग मोकळा; ३D डिझाईन प्रसिद्ध!

March 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0710543

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697