Friday, February 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विकासा बरोबरच मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं – पंकजाताई मुंडे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 5, 2023
in marathwada
0
विकासा बरोबरच मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं – पंकजाताई मुंडे
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंबाजोगाई :- दिनांक 5 – राजकारणात माझा कोणा व्यक्तीला विरोध नाही तर प्रवृत्तीला आहे. राम, अर्जुनासारख्या प्रवृत्ती समाजाचं भलं करत असतात, धर्माची स्थापना करत असतात. याऊलट रावण अहंकारी होता, अगदी तसंच राजकारणात जेव्हा सत्तेला अहंकाराची बाधा होते तेव्हा गर्वाचं घर खाली होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ विकासच नाही तर परळी मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं. तुमची सेवा करणं माझं कर्तव्यच आहे, त्यासाठी आता तुम्हीच मला दत्तक घ्या, गावोगावी विकासाची लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं.

घाटनांदुर, सोमनवाडी, निरपना व बागझरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे १४ कोटी रूपयाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शनिवारी झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, गणेश कराड, हिंदूलाल काकडे, संजय गिराम, जीवनराव किर्दत, बिभीषण गिते, बंडू चाटे, घाटनांदुरचे सरपंच महेश गारठे, दत्ता जाधव, लतीफभाई कुरेशी, सोमनवाडीच्या सरपंच यमुनाबाई सोनवणे, बागझरीचे सरपंच विनोद लहाने आदी यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, परळी फार गुणी मतदारसंघ होता पण त्याला अवगुणी करण्याची सुपारी काहींनी घेतलीय. मी आमदार असताना गावोगावच्या विकासाला सुरवात केली ती आजही सुरू आहे. आपण लोकनेते मुंडे साहेबांसारखा नेता देशाला दिला, त्यांचेवर जीवापाड प्रेम केलं, ते कर्ज माझेवर आहे, आपली सेवा करणं, महिलांना सुरक्षा, सन्मान देणं माझं कर्तव्य आहे. राजकारणात हार जीत असतेच, माझ्या पराभवाची जेवढी चर्चा झाली, तेवढी त्यांच्या विजयाची झाली नाही. आता मी नसण्याची किंमत लोकांना कळायला लागलीयं. मंत्री असताना मी खऱ्या पालकत्वाची भूमिका निभावली. आरोग्य केंद्रापासून ते स्मशानभूमी पर्यंत प्रत्येक गावाला न मागता निधी दिला. ते माझं कामच होतं. पण केवळ विकासच नाही तर चांगली संस्कृती रूजवून मतदारसंघाला पूर्वीसारखे दिवस आणायचेत असं पंकजाताई म्हणाल्या.

एवढी कामं केली पण कधी श्रेय घेतलं नाही
मंत्री असताना एकेका गावाला पाच पाच कोटीचा निधी दिला, पण कधी श्रेय घेतलं नाही की नारळ फोडायला आले नाही. गुत्तेदार कोण आहे हे ही कधी जाणून घेतले नाही. निधी देताना पक्ष, जात धर्म पाहिला नाही, सर्वाना समान निधी दिला. मात्र मध्यंतरीच्या अडीच तीन वर्षांत राष्ट्रवादीकडे सत्ता होती त्यांनी तर काहीच केलं नाही पण मी आणलेल्या निधीचेच नारळ ते फोडत होते. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, जलजीवन मिशनची कामे ही आम्ही मंजूर करून आणलेली असताना त्याचं श्रेय घेण्यासाठी मात्र ते पुढे येत आहेत असा टोला त्यांनी लगावला.

खडयातून तांदूळ काढतेयं..
खरं तर तांदळातून खडे काढायचे असतात पण राजकारणात सध्या मी खडयातून तांदूळ काढण्याचे काम करत आहे, चांगला चांगला माणूस निवडत आहे जेणे करून आपली चांगली सेवा मला करता येईल. मी स्वतःचा स्वार्थ किंवा घरं भरण्यासाठी राजकारणात आले नाही, मला तुमचं हित बघायचयं. मुंडे साहेबांनी तुमच्यासाठी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचयं. आपल्या सेवेतून माझ्या पित्याचं ऋण फेडायच आहे. माझ्या माय माऊलीच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्यासाठी मी इथं आले आहे. आता विकास थांबणार नाही, कुठलीही अडचण येऊ देणार नाही फक्त आपली साथ व आशीर्वाद द्या असं आवाहन पंकजाताई यांनी यावेळी केलं.

लेकीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांची दिवाळी ; जेसीबीने फुलांची उधळण
कार्यक्रमाच्या निमित्ताने अंबाजोगाई तालुक्यातील गावांमध्ये जाताना रस्त्यात धर्मापूरी, कुसळवाडी, बाभळगाव, निरपना, बागझरी, सोमनवाडी येथील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी जेसीबीने फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत-गाजत अतिशय उत्साह आणि जल्लोषात जोरदार स्वागत केलं. प्रत्येक गावात यानिमित्ताने दिवाळीच साजरी झाली. या स्वागतानं आणि गावकऱ्यांच्या या प्रेमानं आपण भारावून गेलो असे पंकजाताई म्हणाल्या. कार्यक्रमास ठिक ठिकाणी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Post Views: 214
Previous Post

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची लातूरात आत्महत्या; स्वतःवर गोळी झाडत संपवले जीवन

Next Post

LIVE | नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माध्यमांशी संवाद…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE | मुंबई विधान भवन येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माध्यमांशी संवाद…

LIVE | नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माध्यमांशी संवाद...

ताज्या बातम्या

खंदक बागेत अचानक लागली आग.. #solapurnews #solapur #popular #mh13newssolapur

February 26, 2026

NMMS परीक्षेत लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालयाचे यश..#public #school #students #viral

February 26, 2026

रामभाऊ जोशी हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश #public #viral #tranding #school

February 26, 2026

अतिरिक्त उत्खननाचा ग्रामस्थांचा आरोप..#public #viral

February 26, 2026

पत्रकार सचिन शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.. #public #marathinews #viral

February 26, 2026

रामनवमी 2026 ची नियोजन बैठक संपन्न. #public #ramnavmi #tranding #ram #ramrajya #jayshreeram

February 26, 2026

सोयगाव येथे आई महोत्सावा निमित्त जि.परिषद केंद्र प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

February 26, 2026

बापरे ssss.. शहर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला.. #public #marathinews #viral #temperature #mh13

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0706571

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697