बार्शी – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर इंग्लिश स्कूलच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व महिला पालकांचे शाळेच्यावतीने फुलांची उधळण करुन स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रिटा नेटके यांनी आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२९ व्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महिला दिनाच्यानिमित्ताने उपस्थित महिला पालकांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळामध्ये सर्व महिलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी संस्थेच्या सचिवा कल्पनाताई बारबोले यांच्या विशेष उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सर आणि भोसले सर यांनी केले. तर मुख्याध्यापिका सौ. रिटा नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधु-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.

























