श्रीपूर – महाळुंग ग्रामपंचायतीचे महाळुंग – श्रीपूर नगरपंचायती मध्ये रुपांतर होऊन ४ वर्षाचा कालावधी लोटला असून कायम स्वरूपी मुख्याधिकारी नाही तसेच प्रशासकीय सेवेतील ८ पदे रिक्त असल्याने नगरपंचायीचे काम थंड पडले असल्याने या प्रश्नी सरकारचे नेमके धोरण काय आहे असा जळजळीत प्रश्न माढा मतदार संघाचे आ. अभिजीत पाटील यांनी विधानसभे मध्ये उपस्थित करून एकूणच शासनाचा कामाचा पंचनामा केला . महाळुंग ग्रामपंचायीचे महाळूंग – श्रीपूर नगरपंचातीचे रूपांतर होऊन चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे . परंतू नगरपंचायत झाल्या पासून ना कायम स्वरूपी मुख्याधिकारी व प्रशासन अधिकारी त्यामुळे जसे नावडितीचे मुल असते तशीच परिस्थिती या नगरपंचायतीची झाली आहे .
खरे तर नगरपंचायत झाल्यावर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील यात प्रामुख्याने नागरी वस्त्यांमध्ये गटारी , अंतर्गत रस्ते , पुरेसे पाणी , स्वच्छता , व सिमेंटचे पक्के रस्ते या मुलभूत सुविधा मिळतील असे वाटत होते . परंतू चार वर्षाचा कालावधी पाहता पहिल्या सारखी ग्रामपंचारतच बरी होती असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली .
नगरपंचायतीच्या ४ वर्षाच्या काळात सुमारे ११ मुख्याधिकारी येवून गेले अपवाद सोडता सर्व जण प्रभारी असलेले आठवड्यातून दोन वेळा येत असत . मात्र महत्वाचे अन्य अधिकारी यांची नेमणूकच न झाल्याने अधिकाऱ्याविना पोरकी असल्याने कोणतेही भरीव काम होत नाही वा झाले नाही . नागरिक कोणतेही काम घेवून गेले तर अधिकारी नाहीत ही सबब सांगितली जाते .
वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यात महसुली उत्पन्नाच्या बाबतीत अकलूज खालोखाल महाळुंग – श्रीपूर नगरपंचायत येते तरीही अशी अवस्था आहे .
या सर्व परिस्थितीची शोशल मिडीया व वृत्तपत्रांनी वेळो वेळी पोलखोल केली परंतू परिस्थितीत काहीच फरक पडला नाही .
परंतू या गंभीर प्रश्नी आ . अभिजित पाटील यांनी विधानसभेत जाब विचारताना या नगरपंचायती मध्ये करनिरिक्षक प्रसासकिय अधिकारी २ पदे , लेखा आणि परिक्षण २ पदे , आस्थापना अभियंता १ पद , पाणी पुरवठा अधिकारी १ पद , नगररचनाकार १ पद , स्वच्छता निरीक्षक १ पद अशी आठ पदे असून यात दोन पदे भरली आहेत त्यात ऋतुजा गायकवाड या आठवड्यातून एकच दिवस येतत तर नूतन जाधव या मला येथे रुजू करून घेता येत नाही कारण मला दुसरी परिक्षा द्यायची आहे म्हणजेच ही आठही पदे रिक्त असल्या सारखीच आहेत . म्हणजे पूर्ण वेळ मुख्याधिकारी व प्रशासन अधिकारी जर नेमलेच नाहीत तर कामकाज कसे चालणार असा सवाल केला आहे आ . अभिजित पाटील यांनी महाळूंग – श्रीपूर नगरपंचायतीच्या कामाचे शासकीय दुरावस्थेमुळे होणाऱ्या नुकसानीवर प्रकाश टाकल्याने व शासन दरबारी प्रश्न मांडल्याने सरकार नेमकी कसे पावले उचलते हे पाहणे आवश्यक आहे .
नगरसेवकांची मोठी गोची
नगरपंचायत स्थापनेनंतर पंचवार्षिक निवडणूकीत मोहीते पाटील गटाचे ९ सदस्य निवडून आले यात विद्यमान उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटिल यांचे ५ , नानासाहेब मुंडफण ४ , तर विरोधी राहूल रेडे – पाटील (बबनदादा शिन्दे गट ) ६ , भाजपा अनिल जाधव गट १ , व कॉग्रेस धवलसिंह मोहीते पाटील १ असे १७ नगरसेवक निवडून आले . त्यामुळे मोहीत पाटील गटाची सत्ता स्थापन झाली . परंतू शासकीय अधिकारी नसल्याने कोणतेही भरीव काम न झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदारांसमोर काय कामे केली कसे सांगणार अशी गोची नगरसेवकांची झाली आहे .























