सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे शनिवारी सोलापूर शहरात आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
जरांगे पाटील यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चौक परिसरात कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, मध्यवर्ती महामंडळाचे पद्माकर काळे, दिलीप कोल्हे, राजन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जयवंत सलगर, लता फुटणे, प्रकाश ननवरे, मतीन बागवान, नागेश वडणे, सचिन स्वामी, देविदास घुले, बसवराज कोळी, बजरंग जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 13