सोलापूर – उपळाई बुद्रूकचे सुपुत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांना पुणे येथे नॅशनल आयडियल पर्सनालिटी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले राष्ट्रभक्ती संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.
गेली ३३ वर्षे गोरे हे साहित्य संवर्धनाचे कार्य करीत आहेत आजवर विविध १९३ साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या बुधभूषण या ऐतिहासिक ग्रंथाचा त्यांनी मराठी काव्य अनुवाद केला आहे.
ते प्रकाशक संपादक असलेल्या युंगधर प्रकाशन संस्थेच्या वतीने १४८ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन आजवर झाले आहे. त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक अभिनेता व संगीतकार म्हणून केलेल्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटाने काना बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिकावर आपली मोहोर उमटवली आहे.


























