धाराशिव – पोदार प्रेप, धाराशिव येथे सीनियर केजी विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन सेरेमनी मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली. लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. 🎓
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनमोहक नृत्य सादरीकरणाने झाली. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नृत्याने उपस्थित पालक व पाहुण्यांची मने जिंकली.
यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कॅप व केप परिधान करून आकर्षक रॅम्प वॉक सादर केला. आत्मविश्वासाने चाललेल्या या रॅम्प वॉकला उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या समारंभातून विद्यार्थ्यांच्या प्री-प्रायमरी शिक्षणाच्या टप्प्याचा आनंददायी समारोप झाला.
यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. वाल्मिक सोमासे सर व उपप्राचार्य श्री. निलेश जाधव सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य श्री. वाल्मिक सोमासे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना सांगितले की, “आज हे लहान विद्यार्थी पहिल्या इयत्तेत प्रवेश करण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. त्यांचे उज्ज्वल भविष्य घडावे आणि ते पुढील शिक्षणातही यशस्वी व्हावेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोदार प्रेप धाराशिवच्या मुख्याध्यापिका रेशमा संकपाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी अॅडमिन ऑफिसर श्री. जीवन कुलकर्णी सर यांनी विशेष सहकार्य करून उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही हा दिवस अत्यंत आनंददायी व संस्मरणीय ठरला.




















