Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सर्व सामान्य शेतकरी दीपक वैद्य झाले झेडपीचे नवे अध्यक्ष ! 

तरुण भारतbyतरुण भारत
March 19, 2026
in editor
0
सर्व सामान्य शेतकरी दीपक वैद्य झाले झेडपीचे नवे अध्यक्ष ! 

oplus_0

0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य आणि उपाध्यक्षपदी मार्डीचे इंद्रजीत पवार यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार बंद लिफाफामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची नावे दाखल झाल्यानंतर अर्ज सादर करावयाच्या दिवशी बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि चेतन सिंह केदार यांच्यासह गटनेत्या रश्मी बागल, नेताजी खंडागळे, बालाजी नरोटे आदींनी पुढाकार घेत अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य तर उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजीत पवार या दोघांचे अर्ज दाखल केले.

यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी तथा साहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी संतोष देशमुख, महसूल उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, तहसीलदार पूनम दंडीले यांनी स्वीकारले. यावेळी अध्यक्षपदाच्या अर्जासाठी बालाजी नरोटे सूचक तर नेताजी खंडागळे अनुमोदक राहिले तर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या अर्जासाठी पृथ्वीराज माने हे सूचक तर चेतनसिंह केदार हे अनुमोदक राहिले. दुपारी बारा वाजता अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे नेते काहीकाळ बालाजी सरोवर येथे चहापानासाठी दाखल झाले. 

      दरम्यान, सभेच्या निर्धारित वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद हे यशवंतराव सभागृहात दाखल झाले. त्यानंतर सभेच्या वेळेनुसार नूतन सदस्य दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सभागृहात येण्यास सुरुवात झाली. आलेल्या सर्व सदस्यांच्या सह्या प्रशासनाने मस्टरवर घेतल्या. तदनंतर भाजपचे प्रमुख नेते आणि अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सभागृहात दाखल झाले. निर्धारित वेळेनुसार सभेची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. त्यानंतर निवडणुकीचे कामकाज उप जिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी सुरू केले. या कामकाजात पीठासीनाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अध्यक्ष निवडीचे कामकाज सुरू केले. यावेळी अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य यांचा एकमेव तर उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजीत पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध जाहीर होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केले. यावेळी सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. तदनंतर पिठाासीन अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नूतन अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

      एकंदर सोलापूर झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ‘सव्वा-सव्वा वर्ष’ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला असून अध्यक्षपदासाठी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदासाठी उत्तर सोलापूरचे इंद्रजीत पवार यांची बिनविरोध निवड झाल्याने बार्शी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद समोर एक जल्लोष केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ ‘सव्वा-सव्वा वर्ष’ असा राहणार असून त्यानंतर इतर सदस्यांना संधी दिली जाणार आहे. या निर्णयाला संबंधित सदस्यांनी संमती दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फोटो ओळ – सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करताना दीपक वैद्य तर दुसऱ्या छायाचित्रात उपाध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करताना इंद्रजीत पवार यावेळी गटनेत् रश्मी बागल, नेताजी खंडागळे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतन सिंह केदार आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळ – अध्यक्षपदी दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सत्कार करताना पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्यासह बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे पाटील, आदींची उपस्थित होती.

Post Views: 59
Previous Post

पोदार प्रेप, सीनियर केजी विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात

Next Post

मनपा शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी स्नेहा पुजारी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मनपा शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी स्नेहा पुजारी

मनपा शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी स्नेहा पुजारी

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958370

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!