सोलापूर – आपण जवळ असताना एखाद्याला हृदय विकाराचा झटका आल्यास सर्वप्रथम त्याची नाडीची स्पंदने आणि श्वास चालू आहे का हे पहावे जर चालू असेल तर सदर पेशंटला मिनिटाला शंभर वेळा याप्रमाणे सी पी आर देण्यास सुरुवात करावी आणि वेळेत दवाखान्यात पोहोचवावे असे केले तर संबंधित व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात असे प्रतिपादन हृदयरोग तज्ञ डॉक्टर बसवराज सुतार यांनी केले.
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए.आर. बुर्ला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सन फार्मा यांच्यावतीने फुफ्फुस व हृदय पुनरुज्जीवन प्रशिक्षण ( CPR) शिबिरा शिबिर आयोजित केले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अशोक यक्कलदेवी,राजकीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर राजे व डॉ. अँनी जॉन उपस्थित होत्या. पुढे बोलताना सुतार म्हणाले की, हृदयविकाराचा झटका आल्यास पेशंटसाठी प्रारंभीची दहा मिनिटे खूप महत्त्वाची असतात कारण याच वेळेला हृदय, फुफ्फुस आणि मेंदूला ऑक्सिजन मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
CPR दिल्यास हे शक्य होऊ शकते. यामुळे सदर व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. अन्यथा एखाद्या व्यक्तीला मेंदूचा झटका येऊ शकतो आणि कदाचित ती व्यक्ती दगावू शकते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी वयाच्या 40 चे पर्यंत सर्व प्रकारचे व्यायाम केले तरी चालते पण 40 नंतर शरीराला ताण देणारे व्यायाम करावेत . दिवसातून कमीत कमी 45 मिनिटे व्यायाम करावा.वेगाने चालणे, सावकाश चालणे, सूर्यनमस्कार, योगा व प्राणायाम सारख्या व्यायामामुळे आपल्या हृदयाबरोबर फुफ्फसाचे आरोग्य चांगले राहते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन फार्माचे श्री आदित्य बोने यांनी केले आभार प्रदर्शन डॉ शंकर राजे यांनी केले. तर सूत्रसंचालन सन फार्माचे विनायक चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
फोटो ओळ – ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालयात फुफ्फुस व हृदय पुनरुज्जीवन प्रशिक्षण ( CPR) प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर बसवराज सुतार व उपस्थित मान्यवर


























