अक्कलकोट : तालुक्यातील श्रीक्षेत्र बासलेगांव येथील श्री जगदंबा जागृत देवस्थान यात्रा महोत्सव २०२६ हे मंग्वारी रात्रौ च्या डोंगरावरील रात्रभराच्या जागरण गोंधळाने मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. मुंबई, कर्नाटक राज्यातील देवीभक्त दाखल झाले असून, सदर ही यात्रा गुरुवार दि. २ एप्रिल पर्यंत आहे. या निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीने कळविले आहे.
या विविध धार्मिक कार्यक्रमात बुधवार दि. १ एप्रिल रोजी रात्रौ. ९ वा. डोंगरावर लोटांगण व मशाल मिरवणूक, रात्रौ. १०वा. ३० मी. कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, दि. २ एप्रिल रोजी सकाळी ८. वा.३०मी श्री देवीची आरती, सायंकाळी ५ वा. ३०मी. जंगी कुस्त्या, रात्रौ. १० वा. ३० मी कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आलेली असून, या विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहेत.
माथाडी कामगारांची उपस्थिती-
श्री क्षेत्र बासलेगांव येथील बहुतांश रहिवाशी हे मुंबई कृषी उत्तन्न बाजार समिती, वाशी मार्केट या ठिकाणी माथाडी कामगार व दुकानदार आहेत. श्री जगदंबा यात्रे करिता प्रत्येक माथाडी कामगार हा भक्त असून, आपली सेवा बजाविण्याकरिता बासलेगांव गाठतोच, ही परंपरा आजही कायम आहे.
सर्व जाती-धर्माचे बासलेगांव ग्रामस्थ एकत्र- बासलेगांवात सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात. यात्रेनिमित्य सर्वजन एकत्र येत असतात. एक राष्ट्रीय एकतेचे प्रतिक असलेली यात्रा म्हणून बासलेगांवची ही यात्रा सुपरिचित आहे.

















