हदगाव – श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त साधत हदगाव तालुक्यातील मौजे चक्री येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या व नवसाला पावणाऱ्या अशी ओळख प्राप्त केलेल्या हनुमंत रायाच्या चरणी चक्रीतीलच रहिवाशी असलेले तथा भाजपा पश्चिम मंडळाध्यक्ष सूर्यकांत कोंडबाराव हनवते व त्यांचे बंधू चंद्रकांत कोंडबाराव हनवते यांनी आपली राहती जागा ( ४०× ४० ) दान केली असून त्या संबंधित ग्रामसेवक यांना दानपत्रक सुद्धा दिल्याची माहिती सूर्यकांत हनवते यांनी कळवली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल दोन्ही भावांचे भाविक – भक्तांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. यावेळी माजी सरपंच गजानन सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, सुधाकर महाजन, संदीप सूर्यवंशी, वसंतराव खोडके, चंद्रमणी पाईकराव, राहुल पद्माकर यांच्यासह सर्व गावकरी उपस्थित होते.
राजकारणात सक्रिय सहभाग नोंदविणारे सूर्यकांत हनवते यांनी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सुद्धा हिरहिरीने सहभाग नेहमीच नोंदविला आहे. भाजपा सारख्या पक्षाचा पश्चिम मंडळाध्यक्षपदी निवड होणे म्हणजे धार्मिक, सामाजिक, राजकीय कसोटी पणाला लावणारी आहे. त्यातच चक्री येथे श्री हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सुद्धा होती त्याचवेळी हनवते बंधूंनी आपली राहती जागा हनुमंत रायाच्या चरणी दान केली असून भाविक भक्तांकडून या दोन्ही बंधूंचे कौतुक व अभिनंदन होत आहे.



















