मुदखेड – भिमनगर मुदखेड येथील रहिवासी हा.मु. नांदेड येथे स्थायिक असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब माधवराव चौदंते (वय ६२ वर्षे) यांचे बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दि. २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता मुदखेड येथील बौद्ध स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
का.बाबासाहेब चौदंते हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने चौदंते परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन बहिणी आणि चार भाऊ असा मोठा परिवार आहे. ते मुख्याध्यापक राजकुमार चौदंते, सामाजिक कार्यकर्ते मोहन चौदंते, जयप्रकाश चौदंते आणि कपिल चौदंते यांचे मोठे बंधू होत.

















