मुदखेड – शहरातील भीमनगर भागातील रहिवासी असलेले राजू देवराव हावळे हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झाले असून त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही अद्याप त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. याप्रकरणी कुटुंबातील सदस्यांनी चिंता व्यक्त केली असून कोणालाही माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे नम्र आवाहन केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजू हावळे हे दि. ३ मार्च २०२६ रोजी बारड येथून ऑटोने दुपारी १:३० वाजताच्या सुमारास मुदखेड येथे आले होते.
मुदखेडात आल्यानंतर त्यांनी आपल्या एका ऑटो चालक मित्राला जेवणासाठी हॉटेलमध्ये सोबत चलण्यास सांगितले. मात्र, मित्राला काम असल्याने त्याने येण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राजू हावळे हे एकटेच जेवण करण्यासाठी शहरातील रेल्वे अंडर ब्रिजच्या दिशेने पायी गेले.त्यावेळेपासून ते अद्याप घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी मित्र परिवार, नातेवाईक आणि सर्व संभाव्य ठिकाणी त्यांची शोध मोहीम राबवली, परंतु अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही.
राजू देवराव हावळे यांच्याबद्दल कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे दिसल्यास खालील संपर्क क्रमांक: ९९२१५८४५३३,
९१३०६५३३५७,८०१०५९२१९८
९३०९९२६५३७ त्वरित संपर्क साधावा,वैयक्तिक माहिती
नाव : राजू देवराव हावळे वय ३५ वर्ष, उंची ६ फुट, रंग सावळा,शर्ट पांढरा,निळी जीन्स असे आवाहन त्यांचे बंधू सामाजीक कार्यकर्ते विजय देवराव हावळे व परिवाराकडून करण्यात आले आहे.

















