श्रीपूर – हिंदू धर्माचे अधिष्ठान असलेला भागवत धर्म व आपल्या संतानी सांगितलेल्या शांतता , बंधूता व समता याच्या प्रचार व प्रसार होण्यासाठी निघत असलेल्या . घुमान सायकल रायडर यात्रेची माहिती व्हावी या उद्देशाने माळशिरस तालुक्यात फेेरी काढण्यात आली होती त्याप्रसंगी श्रीपुर मध्ये सतीश यादव बोलत होते .
पुढे बोलताना ते म्हणाले पंढरपूर ते घुमान अशी दरवर्षी सायकल रायडर यात्रा निघत असते या यात्रेची सर्वांना माहिती व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून पत्रकार सुर्यकांत भिसे यांच्या नेेतृवात सुमारे १५० साय सायकल रायडर यामध्ये सामील झाले आहेत .
श्रीपूर नगरीत आगमन झाल्यावर कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे वैदयकीय अधिकारी डॉ . सुधीर पोफळे , डिस्टलरी मॅनेजर आर . एस . पाटील , कंप्यूटर इन्चार्ज तानाजी भोसले,कॅन सुपरवायझर राहुल साठे , कामगार प्रतिनिधी विजय पाटील ,अनंत जाधव , यांनी स्वागत केले यावेळी सर्वांना आल्पोपहार देण्यात आला .
यावेळी डॉ . सुधीर पोफळे यांनी कारखान्याचे संस्थापक कै . सुधाकरपंत परिचारक तसेच विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक , उपाध्यक्ष कैलास खुळे , कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी सामाजिक उपकमास नेहमीच मदत व पाठिंबा दिला आहे . त्याअनुषंगाने आज आम्ही यात्रेचे स्वागत केले व परंपरा जतन केल्याचे सांगत जेष्ठ पत्रकार सुर्यकांत भिसे यांच्या संकल्पनेतून या यात्रेस सुरुवात झाली आज याची वाढलेली व्याप्ती पाहून समाधान वाटते असे सांगितले . सुर्यकांत भिसे यांनी आभार मानले .
















