सांगोला – रानमळा चोपडी (ता.सांगोला) येथे श्री भोजलिंग यात्रा सोहळा सासनकाठीची गावातून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यात्रेनिमित्त संदीप मोहिते महाराज व अतुल हातेकर महाराज यांचा भारुडाची जुगलबंदी तसेच महिलांसाठी व पुरुषांसाठी संगीत खुर्ची, महिलांसाठी होम मिनिस्टर, सिद्धेश्वर संगीत भजनी भारुड मंडळ, दहिवडी यांचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत अनिकेत देशमुख (कोळा), चेतन रूपनर (निमज), सुशांत सरगर (कोळा), विशाल वाघमोडे (कोळा), खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात परी शेंडगे (सातारा), वैभवलक्ष्मी सुर्यवंशी (आष्टा), राजल सावंत (आटपाडी), कार्तिकी उपासे (कोल्हापूर), आस्था चोरगे (सातारा), रेणुका ग्रुप (आदमापुर), मोठ्या गटात सृष्टी जाधव, सानिका भागवत (सातारा), सुरज डान्स अकॅडमी (जत), अनुष्का भंडारी (इचलकरंजी), पायल पाटील (वाळवा), एस आर्ट ग्रुप (वडूज), मास्टर ग्रुप (जयसिंगपूर), आदित्य मोरे (सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविले. रस्सीखेच स्पर्धेत माडगुळकर ग्रुप, माडगुळे हा गट विजेता तर जय शिवराय ग्रुप, चोपडी हा गट उप विजेता ठरला.
याप्रसंगी प्रतिक बाबर यांची भारतीय सैन्य दलात व मयूर बाबर यांची युको बँकेत लिपिक पदावरती निवड झाल्याबद्दल यात्रा कमिटीच्यावतीने सन्मान करण्यात आला. यात्रेनिमित्त दररोज सायंकाळी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. श्री भोजलिंग यात्रा महोत्सव पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
















