Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अमरनाथ यात्रेच्या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयांना अधिकार द्या!

तरुण भारतbyतरुण भारत
April 13, 2026
in editor
0
अमरनाथ यात्रेच्या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयांना अधिकार द्या!
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर –  जम्मू काश्मीर येथील श्री अमरनाथ यात्रा २०२६ साठीची नोंदणी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या संदर्भात, विशेषतः यात्रेकरूंसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय तपासण्यांबाबत, श्री अमरनाथ जी श्राईन बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र राज्यातील अधिकृत रुग्णालये आणि डॉक्टरांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. सदर यादीनुसार, केवळ महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये, विशेषतः मुंबई आणि ठाणे येथे स्थित असलेली रुग्णालये आणि डॉक्टरच यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणि प्रमाणपत्रे देण्यासाठी अधिकृत करण्यात आलेली आहेत.

परिणामी, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आणि इतर जिल्ह्यांतील भाविकांना तीर्थयात्रेबाबत प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण केवळ वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना राज्यभर शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. मुंबई, ठाणे येथे जाऊन मेडिकल तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास महाराष्ट्र राज्यातील भाविक श्री अमरनाथ यात्रा २०२६ करू शकणार आहेत. 

त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अकलूज मंडल सरचिटणीस ओंकार रेखा दत्तात्रय आडत यांनी श्री अमरनाथ जी श्राईन बोर्ड, जम्मू काश्मीर यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून राज्यभरातील सर्व प्रमुख शहरांमधील रुग्णालयांना आणि डॉक्टरांना वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्याचे अधिकार देण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व सरकारी जिल्हा रुग्णालये, उप-जिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांनाही हा अधिकार देण्यात यावा आणि या सुविधांची अद्ययावत यादी तात्काळ प्रसिद्ध करावी अशी विनंती केली आहे.

श्री अमरनाथ यात्रा २०२६ साठी इतर शहरातील प्रमुख रुग्णालये व जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीचे अधिकृत अधिकार प्रदान करण्याबाबत श्राईन बोर्डाने सकारात्मक निर्णय घेतल्यास, महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांना एक सुखकर आणि सुखद तीर्थयात्रेचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी अमूल्य साहाय्य मिळेल असे आवाहन त्यांनी केले आहे. 

—————————————

महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक होतात सहभागी !

हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रेत महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी सहभागी होतात. मात्र आता वैद्यकीय तपासणी फक्त मुंबई, ठाणे अशा शहरी भागात होणार असल्याने भाविकांची संख्येत घट होणार आहे. 

—————————————

 यापूर्वी प्रमाणे ग्रामीण भागातही वैद्यकीय तपासणीचे अधिकार द्यावेत : ओंकार आडत 

यापूर्वी अमरनाथ जी यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागातील रुग्णालये व डॉक्टर्स कडून केलेली वैद्यकीय तपासणी ग्राह्य धरली जात होती मात्र यावर्षी ठराविक रुग्णालयांना हे अधिकार दिल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे!

ओंकार आडत, सरचिटणीस, अकलूज मंडल, भारतीय जनता पार्टी

Post Views: 44
Previous Post

सायली दुधाणे यांची सहाय्यक कर अधिकारी पदावर निवड

Next Post

बार्शीत संभाजी ब्रिगेडची नवी सुरुवात, तालुका कार्यकारिणी जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बार्शीत संभाजी ब्रिगेडची नवी सुरुवात, तालुका कार्यकारिणी जाहीर

बार्शीत संभाजी ब्रिगेडची नवी सुरुवात, तालुका कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0991498

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!