बार्शी – सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष श्री. दिपक वैद्य यांनी अचानक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठो) शाळेस भेट दिली. यावेळी सर्व वर्गातून मराठी विषयाची PAT परीक्षा चालू होती. परीक्षा अतिशय सुरळीत चालू होती हे पाहून अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच शाळेला Arun दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यांचे समवेत उपस्थित असलेले गावचे माजी उपसरपंच आण्णासाहेब लुंगसे यांचाही शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद शाळेतून एकमेव पात्र ठरलेला तसेच सैनिक स्कुलसाठी निवड झालेला विध्यार्थी चि. सर्वज्ञ सतीश वाघ याचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर मल्हार अनंत सदावर्ते, ऋषिकेश बरचे यांचा सैनिक स्कुलसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. विध्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत चित्रकला स्पर्धेत तालुक्यात द्वितीय आलेली कु.सानिका ठोगे व निबंध स्पर्धेत तालुक्यात द्वितीय आलेली अंजली भोंग हिचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नन्हे सितारे या जिल्हा परिषदेच्या या अभिनव उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनी कु.आरोही संतोष पाटील ही स्पोकन इंग्लिशमध्ये जिल्ह्यात दुसरी आली तसेच कु.समृद्धी सचिन शिंदे ही कविता गायन स्पर्धेत तालुक्यात प्रथम आली.तसेच मल्हार सदावर्ते हा विध्यार्थी कथाकथन स्पर्धेत प्रथम आला त्याबद्दल या सर्व विध्यार्थ्यांचा अध्यक्ष दिपक वैद्य यांनी सत्कार केला. तसेच या विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक व मनापासून काम केलेल्या श्रीमती दिपाली गोरे यांचाही अध्यक्षांनी सत्कार केला.
शाळेच्या अडीअडचणी जाणून घेऊन आपण लवकरच त्याची पूर्तता करू असे आश्वासन त्यांनी दिले.शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल काळे यांनी शाळा आजपर्यंत गुणवत्तेत अग्रेसर राहिली आहे आपल्या कारकिर्दीत आणखी पुढे जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी शाळेतील शिक्षक प्रभाकर काटे, आनंद घाडगे, रामचंद्र बरचे, हरिभाऊ दळवी,श्रीमती सुवर्णगौरी शिंदे,श्रीमती मीरा गरड,श्रीमती बेबीनंदा खडबडे,श्रीमती वैशाली खुने,श्रीमती दिपाली गोरे उपस्थित होत्या.
























