सोलापूर : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थांची रुद्राक्ष माळ आणि त्यांच्या चैतन्य पादुकांचे दर्शन घेण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे.
बुधवारी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ येथील लोकमंगल ऑक्सी पार्क जवळील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात दर्शन सोहळा होणार आहे. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरु मंदिर (श्री बाळप्पा मठ) व विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी धारण केलेली पवित्र रुद्राक्ष माळ व गुरु मंदिरातील चैतन्य पादुकांचे दर्शन सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
























