सांगोला – सांगोला महाविद्यालयात थोर भारतीय समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांचे हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महात्मा फुले यांच्या दलित, स्त्री-पुरुष समतेच्या विचाराने भारतात मोठया प्रमाणात परिवर्तन झाले. आजची पुरोगामी स्त्री घडविण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी आहे असे मनोगत डॉ.सुरेश भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन आय.क्यु.ए.सी.को-ऑर्डीनेटर डॉ.राम पवार, कार्यालयीन प्र.अधीक्षक विलास माने यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.एम.डी.वेदपाठक, बाबासो इंगोले यांनी केले.























