Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन आणि एनडीए तयारी व प्रशिक्षण अनावरण

तरुण भारतbyतरुण भारत
April 14, 2026
in editor
0
एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन आणि एनडीए तयारी व प्रशिक्षण अनावरण
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल कॅम्पसमध्ये एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या एनडीए परीक्षा तयारी आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित दहावीनंतरचे करिअर विषयक चर्चासत्रात प्रसिद्ध शिक्षणतज्ञ व करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर व कर्नल डी.के.उपाध्याय यांनी करिअरच्या विविध पर्यायांविषयी आणि संरक्षण क्षेत्रातील करिअरविषयी विशेष मार्गदर्शन केले.


ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य करिअरची दिशा मिळावी तसेच देशसेवेबरोबरच संरक्षण क्षेत्रातील उच्च करिअरच्या संधी याविषयी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे विवेक वेलणकर, वाखरी येथील एमआयटी शैक्षणिक संकुलाचे सहसंचालक कर्नल डी. के. उपाध्याय, विश्वशांती गुरुकुलचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी व ज्युनिअर कॉलेजचे ग्रुप मार्केटिंग व्यवस्थापक योगेश नागपाल उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील शेठ यांनी केले. यावेळी त्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात करिअर निवडताना तज्ज्ञ मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. एमआयटी ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु झालेल्या एनडीए परीक्षा तयारी आणि प्रशिक्षणामुळे पंढरपूर, सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कर्नल डी. के. उपाध्याय यांनी संरक्षण दलातील आर्मी, नेव्ही व एअरफोर्स अशा तिन्ही विभागातील करिअर संधी आणि देशसेवेबरोबरच मिळणाऱ्या सुविधा व मानसन्मान याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी एनडीए मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी आणि नेतृत्वगुण यांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संरक्षण क्षेत्राबद्दल आकर्षण अधिक दृढ झाले.


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना केवळ पारंपरिक पर्यायांचा विचार न करता आपल्या आवडी, क्षमता, कौशल्ये आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन करिअर निवडण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी एनडीए प्रवेश प्रक्रिया, लेखी परीक्षा, एसएसबी मुलाखत आणि प्रशिक्षण याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.


पुढे बोलताना ते म्हणाले ‘जर आपल्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.’ यावेळी त्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, संरक्षण, विविध प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांची तयारी विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित केलेल्या करिअरविषयक विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी संवादात्मक सत्रात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची बिडवे यांनी केले, नारायण देशपांडे व तानाजी डुबल यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तर वीरेंद्र बावस्कर यांनी आभार प्रदर्शन केले.

Post Views: 51
Previous Post

अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीने स्वत:वरच अँसिड ओतून घेतल्याची माहिती आली पुढे

Next Post

हत्तूर येथे ऊसतोड कामगार‌ नोंदणी, नेत्र तपासणी शिबिर संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हत्तूर येथे ऊसतोड कामगार‌ नोंदणी, नेत्र तपासणी शिबिर संपन्न

हत्तूर येथे ऊसतोड कामगार‌ नोंदणी, नेत्र तपासणी शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1245766

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!