पंढरपूर – शहरातील एका अविवाहित तरुणीच्या चेहऱ्यावर अज्ञात तरूणांनी अॅसिड टाकून हल्ला केल्याची धक्कादायक माहितीसमोर आली होती. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली तेव्हा तरुणीने टाँयलेट साफ करण्याचे अँसिड विकत घेऊन ते स्वत:वरच ओतून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही घटना रविवारी (ता.१२) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास येथील नगरपालिका परिसरात घडली होती. दरम्यान तरुणी लिव्हरच्या आजाराने त्रस्त होती. त्यामुळे मानसिक तणावातून तिने हे कृत्य केल्याचे येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी सांगितले.
अॅसिड हल्ला झालेल्या २८ वर्षीय तरुणीला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी तरुणी भेळ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. रस्त्याने पायी जात असतानाच नगरपालिका इमारती जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात तरुणांनी तिच्या चेहऱ्यावर वर अॅसिड टाकले. त्यानंतर भयभीत झालेल्या तरुणीने बाजार पेठेतील एका दुकानदाराच्या मोबाईल फोनवरून हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर तत्काळ जखमी अवस्थेतील तरुणीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये तरुणीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे तिच्या आईने सांगितले होते. दरम्यान तरुणीची प्रकृतीस्थीर असली तरी तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
———————
दरम्यान पोलिसांना अँसिड हल्याच्या घटनेची माहिती मिळताच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरविली. पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणी त्वरीत भेट देवून तेथील सीसीटिव्ही फुटेच मिळविले. सुरुवातीला तरुणीने दिलेल्या जबाबामध्ये काही विसंगती पोलिसांना आढळुन आल्या. त्या नंतर येथील निर्भया पथकाच्या प्रमुख सौ.रावण मँडम, डाँक्टर तसेच मुलीच्या आई समक्ष मुलीची ई साक्ष घेऊन ( जबाब ) रेकाँर्ड करण्यात आला. त्यावेळी तिने आपण एका दुकानातून ६० रुपये देवून टाँयलेट साफ करण्याचे एक लिटर अँसिड विकत घेऊन ज्या भागात सीसीटिव्ही नाहीत अशा ठिकाणी येवून स्वत:च्या उजव्या बाजुच्या तोंडाकडील भागावर ते अँसिड ओतून घेतल्याची धक्कादायक माहिती दिली.
अँसिड ओतून घेण्याचे कारण सांगताना आपण लिव्हरच्या आजाराने त्रस्त असून ट्रेस खाली आहोत. त्यामुळेच आपण हे केल्याचे मुलीने सांगितल्याची माहिती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.
——————
सध्या संबंधित मुलीची तब्येत ठिक आहे. डाँक्टरांनी त्वरीत उपचार केल्यामुळे तिच्या उजव्या बाजूच्या डोळ्यात जे अँसिड गेलेले होते ते वाँशआऊट केलेले आहे. मात्र चेहर्यावर भाजल्याचे व्रण आहेत. आम्ही देखील अजून तपास करीत आहोत. संबंधित तरुणी आता पुर्णपणे फिट आहे. घटना घडल्या नंतर लगेचच आम्ही घटनेची नोंद स्टेशन डायरीला घेतलेली आहे. तिने अँसिड कुठल्या दुकानातून विकत घेतल्याची माहिती दिलेली आहे. त्या दुकानात जावून तेथील सीसीटिव्ही फुटेज देखील मिळते आहे का ते पाहतो आहे. तपास सुरु असून त्या अनुषगाने संबंधित तरुणीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

























