सोलापूर – सारथी स्पोकन इंग्लिशच्या वतीने १५ एप्रिलपासून इयत्ता ४ थी ते ९ वी मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्पीकिंग च्या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘फन वे टू लर्न इंग्लिश’ या संकल्पनेतून मुलांच्या मनातील इंग्लिशची भीती आणि न्यूनगंड नाहीसा करण्यात येतो.
इंग्रजी संभाषण कला, आत्मविश्वास आणि सभा धीटपणा वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात जसे ग्रामर गेम्स ,वर्ड आणि स्पेलिंग गेम्स,वन मिनिट स्पीचेस, टाकाऊ लग्नपत्रिकांचा संडे कार्डशीट अँक्टिव्हिटीजसाठी वापर, फॅमिली ट्री, मॅप रिडिंग, मजेदार इंग्लिश गाणी आदी उपक्रम या शिबिरात राबविण्यात येतात.दर आठवड्याच्या उत्कृष्ट उपक्रमांना बक्षीस देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.
सारथीच्या कन्ना चौक येथील मुख्य शाखेत आणि वालचंद कॉलेज समोरील भावनाऋषी हॉस्पिटलजवळील शाखेत सकाळी ९.३० ते ११.०० आणि दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत १० जून पर्यंत हे शिबिर चालणार आहे.
अधिक माहितीसाठी मुख्य प्रशिक्षक प्रा. विठ्ठल वंगा (९८९०९२५९९६) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
























