सोलापूर – आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय एम.डी., संचालक यांनी ऑक्टोंबर २०२५ नंतर योजनेचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत लाभार्थी विरोधी बदल केल्यामुळे लाभार्थ्यांना समस्या येत आहेत. केलेले बदल त्वरीत मागे घेणेबाबत अशी मागणी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या लाभार्थ्यांना LY लवकर मिळत नाही. महामंडळाकडून वाहन कर्ज बंद करण्यात आले आहे आणि व्याज परतावा वेळेत मिळत नाही. यामध्ये चार मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
पात्रता प्रमाणपत्र देण्यासंदर्भात दि. ८ ऑक्टोंबर २०२५ पूर्वी कार्यान्वित असलेली नियमावलीच लागू करावी. प्रमाणपत्रासाठी लागू केलेली विशिष्ट उत्पन्न मर्यादेची अट तात्काळ रद्द करावी. वाहन कर्ज व्यवसायासाठी अर्ज करणाऱ्या लाभाथ्यर्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा व लाभार्थ्यांना व्याज परतावा कमीत कमी वेळेत मिळण्यासाठी योग्य नियोजन करावे. अश्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांने लाभार्थी हिताचे भूमिका घेतली नाही तर मुंबई येथे महाराष्ट्रातील लाखो मराठा समाज बांधव महामंडळाच्या मुख्य कार्यालयात येवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा आंदोलक राम जाधव यांनी दिला. यावेळी युवराज पाटील, किरण शिरसागर, अमित जाधव, शुभम खाटमोडे यावेळी उपस्थित होते .

























