सोलापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), नवी दिल्ली यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला असून, सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई), केगाव, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे.
यंदा शाळेतून एकूण ७७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले. यापैकी १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले, तर ३६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तसेच १६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले.
निकालात विक्रांत पवार (९५.२०%) याने प्रथम क्रमांक पटकावला. राजवीर गुंड (९४.४०%) द्वितीय, तर प्रमेघ भोसले (९३.४०%) तृतीय क्रमांकावर राहिले.
या यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निखहत शेख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



























