सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जनमंगल पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये आज जनमंगल फाउंडेशन व जनमंगल पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर जनमंगल पतसंस्थेच्या कार्यालयासमोर मोफत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जनमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष कानिफनाथ थोरात , सदस्य संतोष क्षीरसागर, जनमंगल पतसंस्थेच्या चेअरमन सविता थोरात, सचिवा प्रीती कांबळे, संचालिका शिल्पा बावधनकर, सागर बावधनकर तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.























