सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जनमंगल पतसंस्थेच्या कार्यालय मध्ये आज जनमंगल पतसंस्था व जनमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी जनमंगल पतसंस्थेच्या चेअरमन सौ.सविता कानिफनाथ थोरात, सचिवा प्रीती कांबळे, संचालिका शिल्पा बावधनकर तसेच इतर संचालिका तसेच जनमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष कानिफनाथ थोरात, जनमंगल फाउंडेशनचे सदस्य संतोष क्षीरसागर, सागर बावधनकर तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.


















