श्रीपूर – येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक तसेच कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांचे संकल्पनेतून व वैद्यकीय अधिकारी डॉ . सुधीर पोकळे यांचे मार्गदर्शनाखाली कामगारांसाठी विविध उपक्रम राबविले जातात यामध्ये संगित शाळा , ज्योडो – कराटे प्रशिक्षिण , मैदानी खेळांच्या स्पर्धा याबरोबरच सायकल रायडर क्लबची स्थापना होऊन याव्दारे कर्मचारी व त्यांची मुले लांब लांबचा प्रवास सायकलवर करतात . अशिच कल्पना कंपनीतील कर्मचारी सतिश लालासाहेब लांडगे व संतोष लिंबा लोंढे यांना सुचली .
भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ येथिल चैत्य स्मारकास अभिवादन करणेची .या ठीकाणाचे महत्व म्हणजे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर जो अस्थिकलश आणला गेला होता तो याठीकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता पुढे ग्रामस्थांनी या ठीकाणी सुंदर स्मारक उभे केले आहे .
श्रीपूर ते मोहोळ जाऊन येवून सुमारे दिडशे कि . मी अंतर आहे .
खरे तर उन्ह्याळ्याचे दिवस असल्या रणरणत्या उन्हात या सायकल रायडरांनी महामानवास केलेले अभिवादन धाडसी म्हणावे लागेल . यांचे बरोबर बावडा येथिल सुरज कांबळे हे सहभागी झाले होते



















