सोलापूर -सिद्धार्थ नगर येथील विचारक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भव्य दिव्य अशी मिरवणूक पार पडली. रिजर्व बँक ऑफ इंडिया चा देखावा सादर करत द प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या पुस्तकातून प्रेरणा घेत कश्याप्रकारे बँकेची स्थापना करण्यात आली याची माहिती बॅनर द्वारे दाखविण्यात आली.
ह्यावेळी मध्यवर्ती चे अध्यक्ष लौकिक राजाभाऊ इंगळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली व मान्यवरांचा संविधान देऊन सत्कार करण्यात आला.
ह्याप्रसंगी समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब दुपारगुडे, संस्थेचे संस्थापक सूरज जगधने, उत्सव अध्यक्ष राहुल शिवशरण, खजिनदार शशिकांत चंदनशिवे, नागसेन बंगाळे, मनीष शिवशरण, धोत्रे सर, बाप्पा सर, निलेश शिरसे, रोहित दावणे, कीर्तिपाल कांबळे, पत्रकार लोंढे सर,कुमार अंकुश, सुशील लोंढे, वैभव साळवे, अडव्होकेट सिद्धिगणे तसेच सिद्धार्थ नगर व महात्मा फुले मधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






















