अक्कलकोट – तीर्थक्षेत्र श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर परिसर अन्नछत्र मंडळ परिसरात बुधवारी व गुरुवरी सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविण्यात आली . वटवृक्ष मंदिर परिसरातील न्याय प्रविष्ठ लॉज पत्राशेड घरे वगळता अनधिकृत बांधकाम ‘ अतिक्रमण ‘ हत्ती तलाव ‘ माणिक पेठ परिसरातील रस्त्यावरील अडथळा असलेले अतिक्रमण गुरुवारी काढण्यात आली .
बुधवार गुरुवार दोन दिवस अतिक्रमण व अनथिकृत बांधकाम नगर पातिकेच्या रडारवर होते . मंगरूळे हायस्कुल चौक येथून हत्ती तलाव अन्नछत्र मंडळाकडे जाणाऱ्या प्रगतीपथावर असलेल्या ३० मीटर रस्त्यावरजी अनधिकृत बांधकाम अतिक्रमण गुरुवारी ही काढण्यात आली . माणिक पेठ या भागातील पन्नास ते साठ अतिक्रमण ‘ रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम अतिक्रमण काढण्यात आली .
अतिक्रमण केलीली दुकाने ‘बाह्य वळण रस्त्यावरील अनधिकृत रहिवाशी घरे जेसीबी ने जमीनदोस्त करण्यात आली . पोलीस निरिक्षक दिपक भिताडे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नपा चे ३० कर्मचारी अधिकारी व ७० सफाई कर्मचारी विद्युत अभियंता धनंजय शेळके ,पाणी पुरवठा अभियंता मनोजकुमार ईश्वरकट्टी सहाय्यक रचनाकार नगर पालिका अककलकोट चे शुभम मागुरे ‘ नगर अभियंता अभिषेक काकडे रचना सहाय्यक उत्कर्ष उकरंडे सहभागी झाले होते ..
जनाजा मज्जीद ‘ माणिक पेठ येथील रहिवाशी घरे ‘ मलनिःसारण प्रकल्प बाजू जवळील अतिक्रमण गुरुवारी काढण्यात आले
























