सांगोला – प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांचे तर्फे चालू वर्षी इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांसाठी सोलापूर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धा परीक्षेत जि.प.प्रा.शाळा महांकाळवाडी, कडलास (ता.सांगोला) येथील विद्यार्थिनी स्वाती सुधीर गायकवाड हिने २०० पैकी २०० गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
यापूर्वी तिने मंथन, प्रज्ञाशोध, एटीएस, अभिरूप अशा विविध स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तसेच या शाळेतील शर्वरी समाधान माने व आर्यन संतोष जाधव हे विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवून प्रज्ञापत्र ठरले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक संतोषकुमार निंबाळकर व सहशिक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल स्वाती गायकवाड हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
























