सोलापूर: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर विद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत एन.एम.एम.एस. परीक्षा २०२५ मध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षा इयत्ता आठवीचा निकाल जाहीर झाला असून या विद्यालयातील कु. पल्लवी शिवानंद कोळी, कु. वर्षाराणी हणमंत कोळी, कु. श्रावणी मल्लप्पा कोळी आणि प्रदीप परशुराम कोळी या चार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास ४८,००० रुपये इतकी शिष्यवृत्ती पुढील चार वर्षात अशी एकूण १,९२,००० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार असून, ही बाब संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद ठरली आहे. सातत्याने उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम ठेवत या शाळेने दक्षिण सोलापूर तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या विद्यार्थ्याना मुख्याध्यापिका चंद्रकला भोरे यांचे प्रोत्साहन, ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय पवार, देवानंद महामुनी, सचिन पाटील, संतोष पाटील यांचे मार्गदर्शन व सेवक वसंत ताकमोगे, रशीद शेख यांचे सहकार्य लाभले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री.जगदाळे साहेब, उपविभागीय अधिकारी दिनेश दाभाडे, निकम साहेब, लाईफ मेंबर राजेंद्र केदार, विद्यालयाचे मार्गदर्शक बाळप्पा नांगरे मामा, स्थानिक स्कूल समितीचे सदस्य सुनीलकुमार नांगरे, अशोक बिराजदार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धाराम विंचुरे, सरपंच लक्ष्मी नरोटे, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ यांच्यासह पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी आणि पालकांनी अभिनंदन केले.
१) कु. पल्लवी शिवानंद कोळी
२) कु. वर्षाराणी हणमंत कोळी
३) कु. श्रावणी मल्लप्पा कोळी
४) प्रदीप परशुराम कोळी

















