कुर्डूवाडी – शहरात तीनशे नव्हे दोनशे पंच्च्याहत्तर कोटींची विकासकामे झाली असून त्याचे रितसर स्टृक्चरल आँडीट पुर्ण झाल्याने कामात शंखा घेण्याचे कारण नाही.नगराध्यक्षा जयश्री भिसे यांना यावर बोलण्याचा अधिकारच नाही.त्यांनी अगोदर माहीती घ्यावी. त्यांच्या कार्यकाळातील शंभर दिवसात वीस पैकी एकाही नगरसेवकांच्या वार्डातील शहराच्या विकासासबंधीच्या बासष्ठ विषयापैकी एकही विषय सभेमध्ये घेतला नसल्याचा पलटवार राष्टृवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कुर्डूवाडी नगरपालिकेतील विरोधीपक्षनेते तथा माजी नगराध्यक्ष समिर मुलाणी यांनी दै.तरूण भारतशी बोलताना म्हटले आहे.
@ कुर्डूवाडी नगरपालुकेत सध्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे व राष्टृवादी काँग्रेसचे गटनेते समिर मुलाणी यां
च्यामध्ये शहराच्या विकासकामावरून शाब्दीक वार पलटवार सुरू आहेत.समिर मुलाणी यांनी पत्रकार परिषद घेवून कर्तूत्वशुन्य नगराध्यक्ष असा उल्लेख करून वादाला सुरवात केली.या पत्रकार परिषदेचे सविस्तर वृत्त दै.तरूण भारतने प्रकाशीत केले आहे.याला उत्तर म्हणून नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी काल गुरवारी पत्रकार परिषद घेवून आपल्या काळातील तीनशे कोटीची विकासकामे कशी निकृष्ठ दर्जाची झाली याचा लेखाझोकाच सादर केला.
@ जयश्री भिसे यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रीया देताना समिर मुलाणी यांनी देखील त्यांच्यावर घणाघाती आरोप करत नगराध्यक्षांच्या चिरंजीवाने शहराबाहेर जिथ एकही लोकवस्ती नाही अशा ठीकाणी रस्ते व गटारीसाठी दोन ते सहा कोटीपर्यंत निधी शासनाकडून कशासाठी आणला.नगराध्यक्षा जनतेची दीशाभूल करित असून चिरंजीवाच्या माध्यमातून मलीदा खाण्याचे त्यांंनी प्रयत्न करू नये असा सणसणाटी आरोप केला.कुर्डू बेंद ओढ्यापुढील रस्ता हा माझ्या शेतात जाण्यासाठी बनवला नसून डी.पी.आर.मध्ये मंजूर असलेला रस्ता असल्याने तो बनवला असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले.
माझ्या काळात २७५ कोटी मंजूर झाले होते. त्यातील फक्त भुयारी गटाराच्या ७० कोटींच्या कामाचे उद्घाटन झाले. मी केलेल्या काही कामांना ६ ते ७वर्ष झाली आहेत. त्यामुळे त्याची देखरेख व दुरुस्तीची कामे ही प्रशासनाने करावयाची असतात. नगराध्यक्ष आपल्या मुलाच्या माध्यमातून मलिदा खाण्याचे काम करू लागल्या आहेत असे त्यांनी शेवटी ठणकावून सांगीतले.


















