बार्शी – येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय येथे जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार विल्यम्स शेक्सपियर यांच्या जन्मदिनाच्यानिमित्त जागतिक पुस्तक दिन व त्यांना विनम्र अभिवादन करुन वाचनालयात साजरा करण्यात आला.
वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, संचालक धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा, वाचनालयाचे वाचक किरण वखारिया यांच्या हस्ते विल्यम्स शेक्सपियर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक धिरज कुंकूलोळ यांनी केले. यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा. ग्रंथपाल सौ.शितल लुकडे, क्लार्क विराज पतंगे व वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद उपस्थित होते.


















