कुर्डूवाडी – व्यवसायात प्रगती आणि भरभराट करून देण्याचे आमिष दाखवून एका रिअल इस्टेट एजंटची फसवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त भोंदू बाबा मनोहर मामा भोसले याला कुर्डुवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भोसले याच्यासह त्याचा साथीदार विशाल वाघमारे यालाही पुण्यातील मांजरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. २ लाखांची मागणी करून ५० हजार रुपये हडपल्याची फिर्याद दि.२३ रोजी सोलापूरच्या एका एजंटने कुर्डुवाडी पोलिसांत दिली होती. त्या अनुशंगाने कुर्डूवाडी पोलीसांनी आज भोंदूबाबाला माढा कोर्टात दुपारी बारा वाजल्यानंतर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी भेटली आहे.संपुर्ण राज्यभरात भोंदूबाबाबध्दलचे प्रकरण गाजत असताना आणी मनोहरमामा या भोंदूबाबाबध्दलची कमालीची गुप्तता पाळली असताना तपास मात्र महीला पोलीस उपनिरीक्षकाकडे कसा काय आहे याचीच चर्चा सुरू होती. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सारीका गटकुळ करत आहेत.
@ राज्यभरात सध्या भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असताना स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला कुर्डूवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण मनोहर भोसले याला या आधी देखील आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे समजते. मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. फसवणूक झालेल्या फिर्यादीने त्याच्यासोबत नेमकं काय घडलं तो या भोंदू मामाच्या जाळ्यात कसा सापडला यांची सर्व माहिती पोलिसांना दिली आहे.
अगोदर 50 हजार रूपये ॲडव्हान्स
तक्रारदाराने आयुष्यात खूप अडचणी असल्याने धंद्यामध्ये यश येत नसल्याने सदर नंबरवर व्हिडोओ कॉल केला, त्यावेळी व्हिडीओ कॉलवर एक अनोळखी व्यक्तीने ते करत असलेल्या अघोरी प्रथा व जाट्टोणाच्या प्रकाराची पूजे बाबत तक्रारदाराला माहिती दिली त्यानंतर त्या अनोळखी इसमाने तक्रारदाराला मनोहर मामा यांना अघोरी विद्येचे ज्ञान प्राप्त आहे ते तुमच्या जीवनात सुख शांती पैसा हवा असेल तर मनोहर मामा सांगतील तशी तुम्ही पुजा करा असे सांगुन त्याने तक्रारदाराला विश्वासात घेतले. त्यावेळी तक्रारदाराने पुजेला किती खर्च येईल असे विचारले असता त्याने 2 लाख रूपये खर्च आहे परंतु अगोदर 50 हजार रूपये ॲडव्हान्स भराव लागेल तो पण लगेच त्यावेळी तुमच काम होईल.आम्ही बऱ्याच लोकांचे जीवन मामांनी सुखी केले आहे. तुम्हाला अँडव्हॅन्स भरायचा असेल तर दिनांक 23/04/2026 रोजी करमाळा तालुक्यातील निभोरे येथील मठाजवळ येवून पैसे दया असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते.
























