सोलापूर – जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, सोलापूरच्या वतीने स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, गोपाळपूर येथे स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूरच्या पशूधन विकास अधिकारी डाॅ. स्नेहंका बोधनकर यांना देण्यात आले.
सन २०२५-२६ कुक्कुटपालन व्यावसायिक प्रकल्प उभे करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे त्यांचा सन्मान स्वेरी कॉलेजच्या उपप्राचार्य डाॅ. माधवी पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभाग प्रादेशिक सहआयुक्त डाॅ. समीर बोरकर होते. माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सुवर्णपदक प्राप्त झालेले असून यापूर्वी “कन्यारत्न वाचवा समाज देश वाचवा” २००९- १० मध्ये FOGSI या राष्ट्रीय संस्थेमार्फत पुरस्कार प्राप्त झाले आहे.
२०१५ मध्ये नॅशनल सेफ्टी कौन्सिल तर्फे त्यांच्या संशोधन कार्याबद्दल अवॉर्ड देण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२४ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पशुधन प्रहरीमार्फत गौरविण्यात आले आहे.























